आपले फेसबुक पेज

Wednesday 30 January 2013

महाबळेश्वर



सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रा बाहेरही परिचित आहे. काही वर्षापूर्वी उन्हाळ्यात महाबळेश्वरयेथे येणारे पर्यटक सध्या वर्षभर येथील निसर्गाच्या सानिध्यातयेवू लागले आहेत.महाबळेश्वरमधील निसर्ग, जंगल तसेच डोंगरदर्‍या या पर्यटकांना नेहेमीची भुरळ घालीत असतात. या भटकंती दरम्यान क्षेत्र महाबळेश्वर आणि ऑर्थर सीट या स्थळांना पर्यटक आवर्जुन भेट देतात.
महाबळेश्वर सातारा, पुणे तसेच मुंबईशी गाडी मार्गाने चांगलेच जोडले गेले आहे. एस.टी.बसेसचीही सेवा नियमित आहे. महाबळेश्वर एस.टी. स्थानकापासून ऑर्थर सीट साधारण ११ कि.मी. अंतरावर आहे. ऑर्थर सीट कडे जाणार्‍या गाडी रस्त्यावर दुतर्फा असणार्‍या घनदाट जंगलामुळे हा प्रवास नेहेमीच आनंददायी असतो.याच वाटेवर क्षेत्र महाबळेश्वर ही आहे.महाबळेश्वर ते ऑर्थर सीट हा प्रवास खाजगी वाहनाने स्थानिक टॅक्सीने अथवा पायी सददा करता येतो. ऑर्थर सीट चा भाग पुर्वी मढीमहल या नावाने परिचित होता. ऑर्थर सीट च्या टोकावर उभे राहील्यास सह्याद्रीचेरौद्रभिषण कातळकडे नेत्रांना सुखावित असले तरी उरात धडकी भरवतात.ऑर्थर सीट च्या टोकावरुन विस्तृत प्रदेश न्याहाळायला मिळतो. प्रतापगड, रायगड,तोरणा हे किल्लेही येथून दिसतात. याच बरोबर खालच्या दरीत दबाधरुन बसलेला चंद्रगड उर्फ ढवळगडाचा किल्लाही आपले लक्षवेधून घेतो.

1 comment:

साताऱ्यातील नवे वस्त्र दालन