आपले फेसबुक पेज

Sunday 9 September 2012

कर्मवीरांची गाडी रस्त्यावर धावणार!


रयत शिक्षण संस्थेच्या शाखा महाराष्ट्रभर काढण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील ज्या गाडीतून फिरले, ती दुर्मीळ 'विन्टाज कार' पुन्हा एकदा सज्ज झालीय.. सातारच्या रस्त्यांवर दिमाखात मिरवण्यासाठी! १९४८ मध्ये खास अमेरिकेतून ही 'शेवरोले'ची कार मागविण्यात आली होती.सहा सिलिंडर असलेल्या या गाडीत कर्मवीर अण्णा पाच रुपये दरानं गॅलनभर (जवळपास दहा लिटर) पेट्रोल भरायचे. १९६५ पर्यंत
अण्णांच्या हयातीत ही गाडी सर्वत्र फिरली. त्यानंतर आजपावेतो त्यांच्या समाधीजवळच्या बंदिस्त शेडमध्येच ही गाडी बंद अवस्थेत उभी होती.एवढय़ा दशकांनंतर गाडी सुरू करणं म्हणजे भलतंच जिकिरीचं होतं.काल सर्वप्रथम गाडीचं 'ग्रीसिंग, ऑईलिंग' केलं गेलं. नवीन बॅटरी टाकली. नंतर गाडीला सहज म्हणून चावी लावली.. अन् काय आश्‍चर्य? गाडी झटक्यात सुरू झाली. सारेच सुखावले. (अन् चक्रावलेही!)काल ही गाडी बाहेर काढण्यात आलीय.

आपल्या रयत शिक्षण संस्थेचे फेसबुक पेज :: www.fb.com/RayatSatara

No comments:

Post a Comment

साताऱ्यातील नवे वस्त्र दालन