आपले फेसबुक पेज

Friday, 31 August 2012


♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥

सातारा - सातारा हा महाराष्ट्रातील काही मोठ्ल्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. सातारा जिल्हा हा प्रामुख्याने त्याच्या हिल स्टेशन्स (महाबळेश्वर, पाचगणी आणि किल्ले) साठी प्रसिद्ध आहे. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर सातारा हे बऱ्याच काळाकरिता मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेल्या साताऱ्याचा संबंध पुणे, सांगली, मिरज आणि कोल्हापूरशी येतो. सातारचे कंदी पेढे महाराष्ट्रच काय तर संपूर्ण देशभर मोठ्या चवीने खाल्ले जातात. कृष्णा आणि कोयना नदीच्या काठावर वसलेल्या सातारची अजून एक शान म्हणजे येथील मिलिटरी स्कूल (सैनिक स्कूल).
किल्ले अजिंक्यतारा सातारच्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे. शहरामाध्याच स्थित असलेला अजिंक्यतारा शहराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून दिसून येतो. समुद्रसपाटीपासून ३३०० फूट उंचीवर असलेल्या अजिंक्यता-यावरून सातारा शहराचे अतिशय विहंगम दृश्य पहावयास मिळते. अजिंक्यता-याचे खरे सौंदर्य येव्तेश्वर च्या डोंगरावरून पहावालास मिळते.
असे ऐकायला मिळते कि सातारा शहराभोवती असलेल्या सात गडांमुले याला सातारा नाव पडले (सात + तारा = सातारा ). ते सात तारे म्हणजे १.अजिंक्यतारा ,२.सज्जनगड , ३.यवतेश्वर, ४.जरंडेश्वर, ५.नाकडीचा डोंगर, ६.किटलीचा डोंगर, ७. पेढ्याचा भैरोबा.
११ तालुक्यांचा मिळून सातारा जिल्हा बनला आहे. १. सातारा, २.जावळी, ३.कोरेगाव, ४.महाबळेश्वर, ५.वाई, ६.खंडाळा, ७.फलटण, ८.माण, ९.खटाव, १०.कराड, ११. पाटण.

♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥♪♥

No comments:

Post a Comment

साताऱ्यातील नवे वस्त्र दालन